अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण,भांडी,कुंडी कपडयांसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान

रत्नागिरी: जिल्हयामध्ये २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे मालमत्तेचे पंचनामे करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे.या आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाना मदत सुरु करण्यात आली असून यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनाही मदत देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ज्या नागरिकांचे भांडी,कुंडी व कपडयांचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रती कुटुंब ५ हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सद्यास्थितीत जिल्हयामध्ये ५७ ठिकाणी १७१२ लोक सुरक्षित ठिकाणी आश्रयास राहत आहेत. त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन, पिण्याचे पाणी व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना १ ऑगस्ट अखेर पर्यंत ८६ गावातील एकूण १६२६ कुटूंबांना १६२.६ क्विंटल गहु व १६२.६० क्विंटल तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण ३७ गावातील ३०४ कुटूंबांना १५२०लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 0१ ऑगस्ट अखेर एकूण २५ हजार ६६५ लोकांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण १०४ सामाजिक संस्था व २१ व्यक्तींनी पूरग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत मदत केली आहे

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button