
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी फूणगुस मुस्लिम मोहल्ल्यातील तरुण सरसावले……
चिपळूण येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी फूणगुस मुस्लिम मोहल्ल्यातील तरुण एकत्र आले.मुझफ्फर खान,मुनिर अब्बास खान,आरिफ बोदले,मुनिर अ.रहिमान खान,मुज्जमिल मुजावर,मोहसीन खान,इंतीखाब खान,हनिफ खान,नविद खान,शादाब खान,यांनी आपल्या मित्रांना तसेच परदेशात असलेल्या तरुणांना पूरग्रस्त चिपळूणची कल्पना दिली आणि श्यक्य तितका निधी उभा करून पुरग्रस्तांसाठी अन्यधान्य तसेच पाणी आणि दूध या जीवनावश्यक वस्तूंची पहिली पिकअप घेऊन चिपळूण शहरातील अनेक पूरग्रस्तांना थेट त्यांच्या घरात जाऊन मदत केली.मंगळवारी दिवसभर हे कार्य तरुणांनी पार पाडले.यासाठी व्यापारी दानिश खान तसेच यासिन पटेल यांनी आपली वाहने देऊन सहकार्य केले. संकटाच्यावेळी फूणगुस मोहल्ल्यातील तरुणांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून माणुसकी अजून जीवंत असल्याचा प्रत्येय दिला.केलेल्या या मदतीबद्दल पुरग्रस्तांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
www.konkantoday.com