
रत्नागिरी तालुक्यातील शिळ धरण सांडव्याजवळ डोंगर खचतोय
मुसळधार पावसामुळे भूगर्भातील प्रवाहामुळे रत्नागिरी तालुक्यात भूस्खलनाचे प्रकार पुढे येत आहेत. तालुक्यातील शिळ धरणाच्या सांडव्याजवळ भूस्खलन होत आहे. आतापर्यंत सुमारे ४० गुंठे जमीन खचली असून आंबा, काजूची चाळीस झाडे उन्मळलेली आहेत. याचा धरणाला धोका नसला तरीही सांडव्याखालील भागात डोंगराची दगड, माती साचली तर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी शिळ धरणाच्या सोडव्याजवळील काही भागाचे भूस्खलन झाले.
www.konkantoday.com