
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणार्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आणि नियमावली दोन दिवसांत जाहीर केली जाणार
दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आणि नियमावली दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सीईटी परीक्षेविषयीची माहिती दिली असून सोमवार १९ जुलैपासून सीईटीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २१ ऑगस्टपर्यंत ही परीक्षा पार पडण्याची शक्यता आहे.
सीईटीसंदर्भातील नियमावली आणि वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
www.konkantoday.com