
निर्बंध शिथिल करण्याची मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मागणी मुख्यमंत्र्यांनी अमान्य केली
करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांत दुकानांच्या वेळा वाढविण्यासह निर्बंध शिथिल करण्याची मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मागणी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी अमान्य केली. रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: दुकानांच्या वेळा वाढवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनांनी के ली आहे. त्याचे पडसाद बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले
www.konkantoday.com