
पणदेरी धरणावर शासनाकडून निधी खर्च करूनही धरण कधी पूर्ण झालेच नाही व शेतकर्यांच्या शेतात पाणीही पोहचले नाही
मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणास लागलेल्या गळतीमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा गळतीवर उपाययोजना करण्यासाठी जागेवर आलेली दिसून आली. मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या या धरणाकडे लक्ष देण्यास ना स्थानिक शेतकर्यांकडे वेळ होता ना पाटबंधारे खात्याला. शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेला निधी खर्च करूनही धरण कधी पूर्ण झालेच नाही व शेतकर्यांच्या शेतात पाणीही पोहचले नाही. तिवरे धरण दुर्घटनेनंतर पाटबंधारे खात्याने जिल्ह्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण केले. ऑडीटचे अहवाल मंडणगड तालुक्यातील चिंचाळी व तुळशी ही धरणे धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले. पणदेरी धरणाच्या गळतीस पाटबंधारे खात्याचे अधिकारीच जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे.
www.konkantoday.com