
पुढील चार पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस
मागीलअनेक दिवस दडी मारणारा मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. हा मान्सून महाराष्ट्रावर प्रसन्न होऊन राज्यात सर्वत्र धो धो बरसात करणार आहे. पुढील चार पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. तसेच उर्वरित राज्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या हजेरीमुळे दुबार पेरणीचे संकट टळून शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.
www.konkantoday.com