
पंतप्रधान मोदींनी आम्ही त्यांना केलेल्या पुरवठ्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत-खासदार संजय राऊत
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश झाला आहे
राज्यातील चार खासदारांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं. देशाचा कारभार त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. देशात आर्थिक, आरोग्य, रोजगार अशा जबाबदाऱ्या त्यांना सांभाळाव्या लागणार आहेत. प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ मोहरा पडला याचं नवल वाटतंय. पण नारायण राणे ,भारती पवार, कपिल पाटील यांसारख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कपिल पाटील आणि भारती पवार हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहेत तर नारायण राणे हे मूळ शिवसेनेचे होते नंतर ते भाजपमध्ये गेलेत.त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आम्ही त्यांना केलेल्या पुरवठ्याबद्दल दोन्ही पक्षांचे आभार मानले पाहिजेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळावर खोचक शब्दात वक्तव्य केलीकेंद्रात जर तुम्ही पाहिलंत तर अनेक जुने जाणते लोक बाजूला सारण्यात आले आहेत. त्या जागी नव्या आणि युवा लोकांना संधी दिली आहे. या नव्यांना त्यांच्यातील सक्षमता पाहून संधी दिली गेली असेल असं मी मानतो. या सर्व नव्या मंत्र्यांना मी शुभेच्छा देतो. या सर्वांनी महाराष्ट्रातील जडणघडणीत योगदान द्यावं. विशेषत: आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आता लसीकरणाचा जो घोळ होता तो नीट दुरूस्त करावा. नारायण राणे यांनी रोजगार निर्मितीतून युवकांना संधी द्यावी”, असं मतही संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
www.konkantoday.com
