
चिपळुणातच कोविड टेस्टींग करणारी लॅब उभारावी -पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजाताई निकम यांची मागणी
चिपळुणातील स्वॅब तपासणीसाठी मुंबईत पाठविण्यात येत आहेत त्यामुळे अहवाल येण्यासाठी विलंब होत आहे
चिपळूण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे, अशा परिस्थितीत डेरवण रूग्णालयाने नकार दर्शविलेला नसतानाही चिपळूण तालुक्यातील स्वॅब (घशातील नमुने) तपासणीसाठी मुंबईत पाठविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र यामुळे आरटीपीसीआरचे रिपोर्ट मिळण्यास विलंब होत असल्याने प्रशासनाने यासंदर्भात कायमचा तोडगा काढून चिपळुणातच कोविड टेस्टींग करणारी लॅब उभारावी, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. पूजाताई निकम यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
www.konkantoday.com




