
चिपळूण येथील अनेक सावकारानी अजून नूतनीकरणच केलेले नाही ,नियमांची पायमल्ली करून व्यवसाय सुरू
चिपळूण येथील खासगी सावकारांकडून होणाऱ्या लुबाडणूकी बाबत आता अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाने पावले उचलली आहेत एका महिलेने तक्रार केल्यानंतर चिपळूणमधील तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र असे असले तरी आता धक्कादायक माहिती उपलब्ध होत आहे
चिपळूण येथे सावकारी करणाऱ्या १९ परवानाधारकांपैकी फक्त ६ जणांनीच अद्यापपर्यंत परवाना नूतनीकरण केले आहे. बाकी सर्वजण बिनभोटपणे नियमांची पायमल्ली करून सावकारी धंदा करत असल्याचे आता स्पष्टपणे पुढे आले. त्यामुळे आता परवाना नूतनीकरण न करता परवाना असल्याच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यावर निबंधक कार्यालय कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com