
खासदार नारायण राणे यांची केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी? अवजड उद्योग मंत्रालय मिळण्याची शक्यता ,आज बुधवारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष
केंद्रीय मंत्री मंडळात बुधवारी सायंकाळी खांदेपालट होणार असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. राणे यांना मोदी मंत्रिमंडळात अवजड उद्योग कॅबिनेट मंत्रालय मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. नारायण राणे यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्षाला राम राम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राणे यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणे यांना सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीत तातडीने येण्यासाठी भाजप अध्यक्ष जयप्रकाश नडडा यांच्या कार्यालयातून फोन आला होता.
त्यानुसार घडामोडी घडत गेल्या. काही दिवसांपूर्वीच राणे यांच्या सिंधुदुर्ग मधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह हे सिंधुदुर्ग मध्ये आले होते. त्यावेळी राणे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येऊ शकेल असे सूतोवाच शाह यांनी केले होते. त्यामुळे नारायण राणे यांना आता कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याने याबाबत अमित शाह यांनी आपला शब्द पाळला असल्याची चर्चा राणे समर्थकांमध्ये आहे.
www.konkantoday.com



