
कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणार्या कुंभार्ली घाटात प्रथमच अलोरे शिरगांव पोलीसाना टीडब्लूजे टीमने दिले रॅपलिंगचे प्रशिक्षण
कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणार्या कुंभार्ली घाटात प्रथमच अलोरे शिरगांव पोलीस यांना टीडब्लूजे टीमने रॅपलिंगचे प्रशिक्षण दिले.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा कुंभार्ली घाट हा घनदाट जंगल व २०० फूट खोल दरीचा आहे. नागमोडी वळणाचा असलेल्या घाटात नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहनांची २४ तास वर्दळ सुरू असते. त्यामुळे साहजिकच अपघात घाटात घडतात. बर्याचदा घाटातील खोल दरीत दुचाकी, चारचाकी जावून गंभीर अपघात होतो. त्यावेळी जखमींचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. या वेळी शिरगाव पोलीस ग्रामस्थांच्या मदतीने घाटातील दरीत उतरत जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करतात. या वेळी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणून शिरगांव पोलीस यांनी प्रथम घाटात टीडब्लूजे टीमकडून रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतले. या वेळी प्रथमच अलोरे शिरगांव पोलीस यांनी २०० फूट खोल दरीत रॅपलिंग करण्याचा थरारक अनुभव घेतला. अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपलिंगचे पोलिसांनी प्रशिक्षण घेतले.
www.konkantoday.com