
युती टिकली तशी आघाडीही टिकेल’,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना मनापासून काम करत आहे. भाजपसोबत असतानाही शिवसेनेने काम केले. युतीमधून बाहेर पडण्याचा विचार आमचा नव्हता. पण आता आघाडी झाली आहे. चांगली कामे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही; पण काम करण्याची जिद्द असेल तर युती टिकली तशी आघाडीही टिकेल’ असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com