
नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याने लसीकरणातून ही जाहिरातबाजी ? बॅनरवर आरोग्य मंत्र्यांना देखील स्थान नाही
लसीकरणाच्या मिळणार्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो झळकत असल्याने आधीच राज्यात विरोधकांकडून टीका सुरू असतानाच आता रत्नागिरीत देखील लसीकरणात जाहिरातबाजी सुरू झाली आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग व रत्नागिरी नगर परिषद यांच्यावतीने आज ६० वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कार्यक्रम करण्यात आला त्यासाठीचा बॅनर लसीकरणाच्या ठिकाणी लावण्यात आला त्यामध्ये मुख्यमंत्र्यासह राज्यातील मंत्र्यांचे व रत्नागिरी शहरातील स्थानिक नेत्यांचे फोटो झळकत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो वगळता अन्य फोटो शिवसेना नेत्यांचे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नंतर झळकत आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या बॅनरवर स्थान नाही.प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे .परंतु त्यातदेखील आता नेत्यांनी जाहिरातबाजी सुरू केल्याने यापुढे असे बॅनर नागरिकांना पाहायला मिळणार असे दिसत आहे.रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपल्याने आता स्थानिक नेत्यांना लसीकरणाचा ही आधार घ्यावा लागत आहे की काय अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
www.konkantoday.com