
मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली
राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या आहेतमंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. काहीवेळापूर्वीच बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले असून शोधमोहीम सुरु झाली आहे. मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते.त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
www.konkantodaycom