
आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यानसंयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार
कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.
बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com