
तर रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा ! भाजप नगरसेवकांचा नगराध्यक्षांना सल्ला
रत्नागिरी शहराची दैन्या अवस्था या नगरपालिकेत सत्तारूढ असलेल्या शिवसेनेच्या सत्ताधीशांनी केली. दि. १५ मे २०१९ पर्यंत रस्ते गुळगुळीत होणार नंतर दि. २२ मे २०१९ पर्यंत रस्ते गुळगुळीत होणार, आता ‘पाऊस पंधरा दिवस लांबला तर रस्ते होतील’, ही वक्तव्य ऐकून हसावे की रडावे हे कळत नाही. चार वर्ष होऊन पाणी योजना पूर्णत्वास नेण्याची कुवत विद्यमान सत्ताधीशांकडे नाही. कंत्राटदार जबाबदार असे सांगताना हे कंत्राटदार यांनीच निवडले. नगराध्यक्षांनी जबाबदारी झटकून चालणार नाही. ७२ कोटींच्या अंदाजीत बजेट पैकी केवळ ३० कोटीच या पाणी योजनेवर अद्यापपर्यंत खर्च झाले आहेत. नगरपालिकेला प्राप्त रक्कम पूर्णांशाने खर्च करण्यास हे सत्ताधीश अकार्यक्षम आहेत. दि. ७ जून २०२१ पासून पाऊस सुरू होतो. हे सर्वांना माहीत आहे. मात्र अद्यापही रत्नागिरीतील रस्ते खोदकाम चालू आहे. रत्नागिरीकरांच्या संयमाचा अंत पाहणारी ही गोष्ट आहे. आपले अपयश लपवण्यासाठी इसापनीतीतील प्राणी आठवून आपणच जंगल बनवलेल्या रत्नागिरी शहरातील स्तिथी वरून लक्ष विचलित करावे म्हणून विरोधकांना कोल्हाची उपमा देणेचे नाटक नगराध्यक्ष करत आहेत. आपण असफल असू तर कोणतही विकास काम तडीस नेण्याची कुवत नसेल तर नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा. दि. २२ मे २०२१ पर्यंत रस्ते गुळगुळीत झाले नाहीत, पाणी योजना सुरू झाली नाही याचे दायित्व स्विकारत जनतेला दिलेला शब्द पुरा न केल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा आणि स्वतःला रिकाम्या झालेल्या पिंजऱ्यात कोंडून घ्यावे, असा बोचरा सल्ला श्री. समीर तिवरेकर, श्री. राजू तोडणकर, श्री. मुन्ना चवंडे, श्री. उमेश कुलकर्णी यांनी संयुक्त पत्रक काढून दिले आहे.
रत्नागिरी शहराची वाताहत करून नागरिकांना किमान सुविधा देण्यासाठी अपयशी ठरलेल्या नगरपरिषदेतील सत्ताधीशांनी जनाची नाही, तर मनाची बूज राखत आपल्या खुर्च्या सोडाव्यात, अशी मागणी भा.ज.पा. शहराध्यक्ष श्री. सचिन करमरकर यांनी केली आहे.
www.konkantody.com