
सिंधुदुर्ग जिल्हयाचे तत्कालीन निलंबित शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण हेआपल्या बंगल्याची आणि गााडीची चावी कार्यालयात जमा न करता निघून गेले
सिंधुदुर्ग जिल्हयाचे तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना शासनाने निलंबित केल्यानंतरही त्यांनी आपल्या बंगल्याची आणि गााडीची चावी कार्यालयात जमा केला नसल्याने जिल्हा रुंग्णालय कार्यालयाची कुचंबणा झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे मंजुरीसाठी काही फाईल्स आणि बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी काही फाईल्स आणि बिले त्यांनी मंजुरीशिवाय परत पाठविल्याचे समजते. मात्र, अजून काही महत्वाच्या फाईल्स, विशेषतः’कोव्हिड’ संबंधीच्या फाईल्स त्यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येते.त्यांच्या मोबाइलवरही संपर्क होत नसल्याने त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे
www.konkantoday.com