
जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार
रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी केली जाणार आहे. रेल्वे किंवा बसने येणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला पुढं सोडलं जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामध्ये आणखी भर पडू नये याकरता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली
www.konkantoday.com