
ब्रेक द चेन’च्या मिनी लॉकडाउनमुळे नृत्य वर्ग चालक अडचणीत
संगीत, नृत्य ही माणसाच्या आरोग्याशीही निगडित आहे. यामुळे अनेकांचा त्याकडे ओढा आहे गेल्या वर्षी लॉकडाउन संपल्यावर हे वर्ग काही प्रमाणात सुरू होत असतानाच आता ‘ब्रेक द चेन’च्या मिनी लॉकडाउनमुळे नृत्य वर्गातून कलाकारांच्या उपजीविकेच्या साधनाला झळ पोचली. आता जगणं कठीण झाले. गंभीर परिस्थितीशी सामना करावा लागत असल्याची खंत महाराष्ट्र नृत्य परिषदेचे अध्यक्ष अमित कदम यांनी व्यक्त केली.यामुळे यावर अवलंबून असलेल्या समोर मोठी समस्या उभी राहिली आहे
www.konkantoday.com