कामचुकारपणाची तक्रार करतो म्हणून पुष्कर केमिकलमध्ये मधील सुपरवायझर्सचे अंगावर कामगाराने अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ फेकला

पुष्कर कंपनीत रात्री पाळीच्या वेळी कामचुकार कामगारांबाबत वरिष्ठांकडे तक्रार करतो म्हणून सुपरवायझर अजय कुमार सिंग त्यांच्या पाठीवर अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ ओतला म्हणून नितीन वसंत घाटगे या कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत
अजय कुमार सिंग हे पुष्कर कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात ८तारखेला ते बॉयलर प्लॅन्टला भेट देण्यासाठी गेले असता यावेळी काही कामगार कामाच्या वेळेत झोपल्याचे दिसत होते तर काही जण कामचुकार करताना दिसत होते सिंग यांनी त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता याचा राग मनात धरून नितीन घाडगे यांने सिंग यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या पाठीवर मांडीवर अंगावर अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ ओतला त्यामुळे त्यांच्या मानेला पाठीला व हाताला भाजून दुखापती झाल्या व ते जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आरोपी नितीन घाटगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button