
महाराष्ट्र कबड्डीत संघाचा कर्णधार म्हणून चिपळूण तालुक्यातील दसपटीच्या शुभम शिंदे याची निवड
महाराष्ट्र कबड्डी संघाचा कर्णधार म्हणून चिपळूण तालुक्यातील दसपटीच्या शुभम शिंदे याची निवड झाली आहे. त्यामुळे दसपटी विभाग क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ६७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने यश मिळविले. या स्पर्धेत दसपटीतील खेळाडूंनी महत्त्वाचे योगदान दिले.
आता ६८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कर्णधारपदी शुभम शिंदे याची निवड झाल्याने रामवरदायिनी देवस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक, कबड्डी असोसिएशनचे संचालक प्रताप शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com