
कोकण रेल्वे मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार ,काल सात डब्याच्या रेल्वेची चाचणी यशस्वी
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते रोहा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे या मार्गावर विजेवर रेल्वे लावण्याच्या दृष्टीने चाचण्या घेण्यात येत आहेत विद्युती करणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) तपासणी बुधवारी झाली. सात डब्यांची रेल्वे विजेवर चालवत रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता रवाना झाली. या पथकाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर काही दिवसातच विजेवर गाड्या सुरु करता येणार आहेत.
रोहा ते रत्नागिरी या विजेवर इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली होती कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेतलेली ही पहिली चाचणी होती. त्यानंतर काही दुरुस्त्याही इंजिन चालवून करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी) तपासणी केल्यानंतरच व त्यांचा अहवाल आल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी दिली जाणार आहे
www.konkantoday.com