खेड चिपळूण महामार्गावर वन विभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना ताब्यात घेतले

खेड चिपळूण महामार्गावर बुधवारी वन विभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेतले आणि अटक केली आहे.
या वेळी सहा शिकारी पकडण्यात आले.त्यांच्याकडे एक जिवंत दुर्मिळ खवले मांजर सापडले. तर दोन दुचाकीसुद्धा यावेळी ताब्यात घेण्यात आल्या.
वनविभागाला वन्यजीव ( संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार खेड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र . १७ साईबाबा ढाबा खेड रेल्वे स्टेशन जवळ सापळा रचण्यात आला होता. विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर असलेची खात्री वन विभागाच्या पथकाने केल्यानंतर लगेचच पळून जाण्याची कोणतीही संधी न देता चार जणांना चार चाकी गाडी मध्येच ताब्यात घेण्यात आले. तर इतर दोन जणांना जवळपासच्या भागातून ताब्यात घेणेत आले .
जिल्हा व्याघ्र कक्ष समितीचे अध्यक्ष , तथा जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी खवले मांजर तस्करी रोखण्यासाठी वन व पोलीस विभागास समन्वय साधण्याच्या सुचना दिल्या होत्या . सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा व पोलीस विभागाने सुद्धा वनविभागाला सहकार्य केले .
या कारवाईत महेश विजय शिंदे (वय३५, रा. खेड ता. खेड), उद्धव नाना साठे (वय ३८, रा. ठाणे, जि. ठाणे ), अंकुश रामचंद्र मोरे (वय ४८ रा.पोखळवणे ता. दापोली), समीर सुभाष मोरे (वय २१, रा. पोखळवणे ता. दापोली ), अरूण लक्ष्मण सावंत, (वय ५२ रा. ठाणे जि. ठाणे), अभिजीत भार्गव सागावकर (वय ३२ रा. सुकवली ता. खेड) या सहा संशयित आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून तस्करी करण्यासाठी आणलेले खवले मांजर ताब्यात घेणेत आले . गुन्हेकामी वापरलेल्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली .
मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुख्य वनसंरक्षक ( प्रा ) डॉ . क्लेमेंट बेन यांचे मार्गदर्शनाखाली वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक, साताराचे रोहन भाटे व विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, वनक्षेत्रपाल आर.आर. पाटील यांनी खेड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ रस्त्यावर बुधवारी सापळा रचला होता व आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button