
दापोली येथील पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्ना प्रकरणी आज मत्स्य व्यवसाय मंत्र्यांबरोबर बैठक
पंधरा दिवसांत एलईडी मासेमारीच्या बोटी अरबी समुद्रात बुडविण्याचे आश्वासन देणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन वर्षानंतरही त्यावर कार्यवाही झाली नसल्याने दापोली येथील पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले असताना मात्र विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे यांनी या प्रश्नी लक्ष घातले आहे. त्यांच्या पत्रावर मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी आज शुक्रवारी मंत्रालयात बैठक लावली असून आ. राणे यांच्यासह विधान परिषदेचे विरोध पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह हर्णै बंदर कमिटीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनाही या बैठकीला आमंत्रित करण्यात आले आहे.
www.konkantoday.com