
घर खरेदी करणाऱ्यासाठी आता सुवर्णसंधी,अनेक बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर घटवले
घर खरेदी करणाऱ्यासाठी आता सुवर्णसंधी आहे. महिन्याभराच्या काळात अनेक बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर घटवले आहेत. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना आता स्वस्तात गृहकर्ज मिळणार आहे. या महिन्याभरात सुमारे १८ बँकांनी गृहकर्जावरील त्यांचे व्याजदर घटवले आहेत. व्याजदरात कपात करणाऱ्या बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचाही समावेश आहे.
एसबीआयप्रमाणेच एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा या मोठ्या बँकांनीही त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. सुमारे २० मोठ्या बँका ७ टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. रिझर्व्ह बँक इतर बँकांना गृहकर्ज देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
www.konkantoday.com