
मिरकरवाडा बंदरामध्ये नौका जेटीवर आणण्यासाठी रॅम्प बांधणे साठी ४० लाखांचा निधी देण्याची मागणी
मिरकरवाडा बंदरामध्ये नौका जेटीवर आणण्यासाठी रॅम्प बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी ४० लाखांचा निधी आवश्यक असून तो जिल्हा वार्षिक नियोजनमधून द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बशीरभाई मुर्तुझा यांनी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची भेट घेऊन मच्छीमारांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. या वेळी राजन सुर्वे, सिद्धेश शिवलकर, नौसीन काझी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com