
सिगारेट ओढायची तलफ नडली , तरूणाला जीव गमवावा लागला
सासुरवाडीवरून परतताना दुचाकीतील पेट्रोल काढताना सिगरेट पेटवण्यासाठी लायटर पेटविल्याने पेट्रोलचा भडका उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या वसीम पठाण रा शेटेनगर रत्नागिरी याचा मृत्यू झाला हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे घडला
वसीम हा आपल्या सासुरवाडीला म्हणजे कोतवडे येथे गेला होता तेथे आपल्या दुचाकीतील पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत काढत असताना त्याला सिगरेट ओढण्याची तलफ आली पेट्रोल आेतत असतानाच त्याने सिगरेट पेटवण्यासाठी लायटर पेटवला त्यामुळे अचानक पेट्रोलने पेट घेतल्याने वसीम गंभीर भाजून जखमी झाला होता त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्याचा मृत्यू झाला
www.konkantoday.com