
राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी नाणारमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी आज आपलं म्हणणं मांडणार
राज ठाकरे यांच्या दादरच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी नाणारमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी आज सोमवारी अकरा वाजता जमून आपलं म्हणणं मांडणार आहेत. तर राज ठाकरे यांना आधीच्या मनसेच्या विरोधानंतर आताच हा प्रकल्प वाचावा असं का वाटतंय? असा खोचक सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर केंद्रातील भाजपचा एक वरिष्ठ मराठी नेता याबाबत म्हणाला, ‘दोनशे गुजरात्यांना जमीनीचे पैसे मिळायला नको म्हणून अख्खा साडेतीन लाख कोटी रुपयांचा राज्यासह देशाच भाग्य उजळवणारा प्रकल्पच गुजराती राज्याला देऊ करणाऱ्यांना काय म्हणायचं? मराठी माणसाचे तारक की मारक?’
तर दुसऱ्या बाजूला हा राज्यासह देशासाठी ‘कामधेनू’ ठरणारा हा प्रकल्प गाशा गुंडाळण्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधानसभा अधिवेशनानंतर चार दिवसांत उभयपक्षी बाजू समजून घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं सर्वस्वी भवितव्य आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच हाती आहे.
www.konkantoday.com