
पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौर्यावर
शिवसेनेचे युवा नेते व राज्याचे पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौर्यावर येत आहेत. आ. भास्कर जाधव यांनी आयोजित केेलेल्या सुवर्ण-भास्कर महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन ना. ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर प्रथमच त्यांचा कोकण दौरा होत असून, या दौर्याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवाई प्रतिष्ठानच्या वतीने व जि. प. सदस्य विक्रांत जाधव यांच्या पुढाकाराने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणावर सुवर्ण-भास्कर महारोजगार मेळावा होत आहे. शनिवारी सकाळी 11 वा. ना.आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी आ. भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत
www.konkantoday.com