
काही गरजूंना स्वच्छता ठेवण्याच्या अटीवर वडा पाव तसेच टपरी सुरू करण्यास नगरपरिषद परवानगी देणार
रत्नागिरी नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे, टपऱ्या, खोके गेल्या महिन्यात हटविण्यात आले होते व फूटपाथ मोकळे करण्यात आले होते. इतर आपल्याच निर्णयावर आता नगरपरिषद पुनर्विचार करतअसल्याचं कळत आहे नगरपरिषदेने कारवाई केल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा सहानुभूती पूर्वक विचारकरून जेथे रहदारीला अडथळा येणार नाही अशा फुटपाथचे सर्वेक्षण करूनतेथे काही गरजूंना स्वच्छता ठेवण्याच्या अटीवर वडा पाव तसेच टपरी सुरूकरण्याचे परवाने दिले जाणार आहेतरत्नागिरी शहरातील जो फूटपाथ आहे तो संपूर्णपणे मोकळा करूनत्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्याचा निर्णय गेल्यामहिन्यात नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. शहरातील सर्व फूटपाथ आता मोकळेकरण्यात आले आहेत. मात्र कोरो ना कालावधी असल्याने अनेकांचेउदरनिर्वाहाचे साधन येथील वडापावच्या टपऱ्या किंवा अन्य काही व्यवसायआहेत. ते बंद झाल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे त्यांनाव्यवसायाची पुन्हा परवानगी द्यावी, त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीतूनपाहिले जावे अशी मागणी होऊ लागली.त्याचा विचार करूनच या ठिकाणी पदपथांवर वाहतुकीला अडथळा होणारनाही आणि स्वच्छता राखली जाईल अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येईलआणि खरोखरच गरजू असलेल्यांना त्या ठिकाणी पद पथावरील मोकळ्याजागेत रहदारीला कोणताही अडथळा येणार नाही अशा पद्धतीने व्यवसायकरता येईल का याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. त्यानंतरचपरवानगी देण्यात येणार आहे
www.konkantoday.com