
काेकणातील पारंपारिक शेतीला नवीन दिशा देत गांग्रईत फुलवली स्ट्रॉबेरीची शेती
चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा मुलगा पुष्कर याने गांग्रई येेथे स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. त्याचा हा प्रयोग काेकणातील पारंपारिक शेतीला नवीन दिशा देणारा ठरणारा आहे. पुष्कर चव्हाण सध्या खरवते येथील कृषी महाविद्यालयात शेती शास्त्राविषयीचे शिक्षण घेत आहेत. परंतु शेतीची आवड असल्याने शिक्षण घेत असतानाच त्याने गांग्रई येथे आपल्या गावात शेतीवर प्रयोग करण्यास सुरूवात केली.
पुष्करने वाई (जि. सातारा) येथून स्ट्रॉबेरीची ५०० रोपे आणली. दीड गुंठे जागेत त्याने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरीसाठी लागणार्या पाण्याचे आणि खतांचे नियोजन केले. या आठवड्यात स्ट्रॉबेरीचे फळ तयार झाले असून प्रत्येक वेलीवर सात ते आठ फळं आहेत. पुढील तीन महिने स्ट्रॉबेरी हंगाम चालणार आहे.
www.konkantoday.com