
रिक्षा व्यावसायिक मंगेश शिरगांवकर यांनी प्रवाशांची पैशाची बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल कौतुक
रत्नागिरी शहरातील एका रिक्षा व्यावसायिकाने प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे हे दाखवून दिले आहे. प्रवाशांची पंधरा हजार रुपयांची रोकड असलेली बॅग प्रवाशला परत करणार्या रिक्षा व्यावसायिक मंगेश शिरगांवकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कासारवेली येथील मंगेश शिरगांवकर हे अनेक वर्षे रत्नागिरी शहरात रिक्षा व्यवसाय करतात. गुरूवारी सकाळी सन्मित्रनगर येथून अशोक उपाध्ये (रा. बारामती) यांना घेवून बाजारपेठेतील लालचंद सराफ पेढीवर गेले होते. भाडे सोडल्यानंतर ते पुन्हा गीता भवन येथील आपल्या रिक्षा स्टँडवर पोहचले. गाडीतून उतरल्यानंतर मागील सीटवर एक बॅग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता आपण ज्यांना सोडले त्यांचीच बॅग असेल या शक्यतेने ते पुन्हा लालचंद सराफ पेढीजवळ गेले. त्यानंतर आपल्या रिक्षातील प्रवाशांचा शोध त्यांनी घेतला. यावेळी अशोक उपाध्ये लालचंद सराफ येेथेच होते. श्री. शिरगांवकर यांनी ती बॅग उपाध्ये यांना लालचंद सराफ पेढीचे मालक, महिला पोलीस कर्मचारी सौ. श्वेता नारकर यांच्या उपस्थितीत परत केली.
www.konkantoday.com