
माजी खासदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी, सिंधुदुर्गात ४१ जिओ टॉवरउभारणीसाठी प्रयत्न
सध्या सर्वच कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने इंटरनेट ही गरज बनली आहे. कोकणातही वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांनचे काम इंटरनेटमुळे अडू नये, फोनअभावी आरोग्यसेवेपासून कोणी वंचित राहू नये यासाठी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओ टॉवर उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे ४१ ठिकाणी टॉवर उभारणीसाठी जिओ कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे.
www.konkantoday.com




