
रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केटच्या गच्चीत आग, अग्निशमन दलाने आग विझवली
रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट व व्यापारी संकुल इमारतीच्या गच्चीत मध्यरात्री अचानक आग लागली गच्चीत सुके गवत होते त्या गवताने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज आहे इमारती जवळच वीजमंडळाचा डीपी आहे त्यातून स्पार्क झाल्याने ही आग लागली असल्याची शक्यता आहे आग लागल्याचे कळताच आजूबाजूच्या लोकांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला असल्याची खबर दिली त्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन ही आग विझवली त्यामुळे मोठे नुकसान टळले
www.konkantoday.com