
कोरोनाचे कारण देत रनप च्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारला ,पत्रकार संघटनांची नाराजी
कोरोनाचे कारण देत रनप च्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने पत्रकारांच्यात नाराजी निर्माण झाली आहे
आलीमवाडी येथील पाण्याच्या टाकीसाठी १ कोटी २७लाख रुपये मोजून खरेदी करण्यात येणाऱ्या जागेच्या विषया साठी बोलावण्यात आलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या महत्वपूर्ण सभेत कोरोनाची कारण पुढे करत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला आहे नगरपालिकेच्या प्रत्येक सभेला यापूर्वी उपस्थित राहून पत्रकार आपले वार्तांकन करत होते. मात्र सभेला बसण्यास पत्रकारांना परवानगी नाकारल्याने वस्तुस्थिती जनतेसमोर जाऊ शकणार नाही जर नगरपरिषदेने हे निर्णय कायदेशीर केले असतील तर पत्रकारांना सभेला प्रवेश देण्यात कोणतीही अडचण नव्हती त्यामुळे नपाच्या या निर्णयाचा अनेक पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे
www.konkantoday.com