
जि.प. भवनाच्या प्रांगणात दुचाकी पार्किंगला बंदी
जि.प. भवनासमोर असलेल्या राष्ट्रध्वजानजिकच्या प्रांगणात दुचाकी वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार परिषद भवनाच्या बाह्य विभागातील कामकाज आता नियमानुसार सुरू झाले आहे.
राष्ट्रध्वजासमोर दुचाकी वाहनांच्या पार्किंगची संख्या वाढली होती. राष्ट्रध्वजासमोर कोणतेही वाहन उभे करू नये अशी सूचना देणारे फकल प्रांगणात उभारण्यात आले आहे. या फलकासमोरच अनेकजण आपली दुचाकी उभी करून ठेवत होते. राष्ट्रध्वजाचा परिसर वगळून दोन्ही बाजूला फक्त जि.प. पदाधिकारी, खातेप्रमुखांच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जि.प., पं. स. सदस्यांची चारचाकी वाहनेदेखील याच ठिकाणी उभी करून ठेवण्यास रितसर परवानगी देण्यात आली आहे. दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था परिषद भवनाचे प्रांगण वगळून अन्यत्र करण्यात आली आहे. व्हीआयपींच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी प्रांगणातील सर्व जागा आरक्षित करून ठेवण्यात आली आहे. यासाठी प्रवेशद्वाराजवळ एका सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com