
कोविड मोटिव्हेशन सॉंग स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी ने ब्रॉंझ मेडल प्राप्त केले
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आयोजित कोविड मोटिव्हेशन सॉंग स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी ने ब्रॉंझ मेडल प्राप्त केले आहे.
गोगटे ला अशा नावीन्य पूर्ण स्पर्धेत रत्नागिरीत परिसराची व्हीडिओग्राफी केलेली आहे कोविड संग्रामात ..जितेंगे हम …असा संदेश देणाऱ्या स्फुर्ती गीतांमध्ये गायक म्हणून सिद्धी कदम, भाग्यश्री पावसकर, विदिशा कजबजे, जागृती देशमुख, प्राजक्ता वझे, ऐश्वर्या बेडेकर यांनी गायन केले .
गाण्याचे संगीतकार म्हणून शैलेश इंगळे यांनी व चिन्मय जोशी यांनी काम पाहिले तसेच व्हिडीओ चे दिग्दर्शन शैलेश इंगळे याने व प्रसाद साळवी याने छायांकन केले आहे.तसेच या गाण्याचे सूत्रधार प्रा. आनंद आंबेकर होते
सदर स्पर्धेसाठी डॉ.किशोर सुखटणकर, डॉ.मकरंद साखळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आनंद आंबेकर, प्रा.शुभम पांचाळ, महेश सरदेसाई यांनी विशेष सहकार्य केले. या गाण्याचे संगीत संयोजन श्री गणेश घाणेकर यांनी केले तर रेकॉर्डिंग विश्वास सनगरे आणि ईश्वर वातकर यांनी केले व्हिडीओ च्या संकलनाचे कार्य मयूर दळी यांनी केले .विशेष सहाय्य प्रसाद साळवी ,साक्षी चाळके , हेमंत देशमुख , परेश राजीवले ,यांनी केले
मुंबई विद्यापीठातील यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी.कुलकर्णी तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन , कार्यवाह श्री.सतीश शेवडे यांनी अभिनंदन केले आहे
www.konkantoday.com