
अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये कोळंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू होणार
अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये कोळंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग नजीकच्या काळात सुरू होणार आहे. या प्रकल्पात सुमारे ४०० हून अधिक कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.अतिरिक्त लोटे एमआयडीसीत रासायनिक प्रकल्प नको अशी संघर्ष समितीची मागणी आहे. येथे प्रस्तावीत असलेले सहा रासायनिक प्रकल्प संघर्ष समितीने रद्द करायला लावले.
सद्यस्थितीत केवळ रेल्वेचे सुटे भाग बनविण्याचा कारखाना येथे सुरू आहे. आता एक्युआ फुड येझीम ही कंपनी कोळंबीवर प्रक्रिया करणारा कारखाना अतिरिक्त लोटे एमआयडीसीत उभारणार आहे. एक्युआ फुड येझीम ही कंपनी युरोपियन युनियन आणि अमेरिकन खाद्य मानकांनुसार जलचर आणि सागरी उत्पादने निर्यात करते. एक्युआ फुड येझीम कंपनीचे संचालक, एमआयडीसीचे अधिकारी यांनी स्थानिकांची बैठक घेतली
www.konkantoday.com