
चिपळूण पोलिसांची पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती मोहिम
चिपळूण शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. शहर परिसरात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होणारे अपघात लक्षात घेवून शहर पोलिसांकडून पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती दुचाकीस्वारांसाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
विनापरवाना वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे, डबल सीट नियमांचे उल्लंघन करत अपघाती मृत्यू झाला तर वाहन चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी नमूद केले आहे.
www.konkantoday.com