
राजापूर डोंगर रस्त्याच्या देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू
बारमाही मोठी वर्दळ असलेल्या राजापूर तालुक्यातील राजापूर कणेरी डोंगर सागवे या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या महत्वाच्या व रत्नागिरी-सिंधुदुर्गला जोडणार्या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीला सुरूवात झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याच्या उभय बाजूने वाढलेली झाडी तोडणे, गवत कापणे तसेच दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
konkantoday.com