
खेड येथे एटीएम कार्ड बदलून महिलेची ५८ हजार रुपयांची फसवणूक
खेड शहरामध्ये एटीएम मधून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना बोलण्यात गुंतवून एटीएम कार्ड ची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याचा आणखी एक प्रकार घडला आहे काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता यावेळी चोरट्यांनी खात्यातून पैसे तर काढलेत याशिवाय त्यांनी सोनाराच्या दुकानात जाऊन एटीएम कार्डचा वापर करून सोनेही खरेदी केले खेड पोलिसांनी जनतेला जागृत करण्याचे आवाहन केले होते तरीदेखील आणखी ही फसवणुकीची घटना घडली आहे या प्रकारात सौ श्वेता आंब्रे राहणार वराडकर संकुल खेड यांची ५८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने त्यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
फिर्यादी श्वेता आंब्रे या खेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या ते पैसे काढत असताना तेथे दोन अनोळखी इसम आले फिर्यादी या एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांच्या पिन कोड वर त्यांनी लक्ष ठेवले त्यानंतर फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्ड ची अदलाबदल केली त्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून खात्यातून चाळीस हजार रुपये काढून घेतले या दोन अनोळखी इसमाने खेड येथील सागवेकर ज्वेलर्स मध्ये जाऊन फिर्यादीच्या एटीएम कार्डचा वापर करून ते कार्ड स्वाईप करून अठरा हजार रुपये किमतीचे सोनेही खरेदी केले फिर्यादी आंब्रे यांना हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दोन अनोळखी इसमा विरुद्ध खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे हे अनोळखी इसम पंचवीस ते तीस वर्षाच्या वयाचे होते एटीएममधून पैसे काढताना नागरिकांनी सावधानता बाळगणे जरुरीचे आहे
www.konkantoday.com