
कोरोना रुग्णांवर उपचार करताना भरमसाठ बिलाच्या आकारणी बाबत आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत बैठक
चिपळूण शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करताना भरमसाठ बिले आकारली जातात, याबाबत गेले अनेक दिवस चिपळुणात चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार भास्करशेठ जाधव यांनी एक बैठक घेऊ, असे जाहीर केले होते. आज शुक्रवारी ही अत्यंत महत्त्वाची बैठक तहसील कार्यालयात अधिकारी, डॉक्टर, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अत्यंत कुशलतेने आमदार जाधव यांनी ही बैठक हाताळली व डॉक्टरांच्या अडचणी समजून घेतल्या. लोकांच्या सर्व शंकांचं निरसन या बैठकीत झाले आणि प्रतापराव शिंदे यांनीही आपले समाधान झाले, आता आंदोलन नाही, सर्वांनी एकत्र मिळून काम करू व कोरोनाविरोधात लढा देऊ, अशी भूमिका जाहीर केली. या महत्त्वाच्या बैठकीला आ. जाधव यांच्यासोबत प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, कामथे हॉस्पिटलचे डॉ. अजय सानप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, सिद्धिविनायक कोविड केअर सेंटरचे डॉ. विशाल पुजारी, डॉ. डिंपल पुजारी, श्री हॉस्पिटल कोविड सेंटरचे डॉ. अभिजीत सावंत, लाईफ केअर कोविड सेंटरचे डॉ. शाहिद परदेशी, नायब तहसीलदार श्री. शेजाळ आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com