
“देशाप्रती विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून अज्ञान व भीतीपोटी महिलांनी अन्याय,अत्याचार सहन करू नये” -. जिल्हा विधी प्राधिकरण सचिव श्री आनंद सामंत
रत्नागिरी -देशाप्रती विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ठेवून अज्ञान व भितीपोटी महिलांनी अन्याय व अत्याचार सहन करू नयेत असे आवाहन न्यायाधीश व जिल्हा विधी प्राधिकरण सचिव श्री आनंद सामंत यांनी निवळी गावडेवाडी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमात केले.यावेळी जेष्ठ विधीज्ञ श्रीम.सुखटणकर, पंचायत समिती सदस्य सौ साक्षी रावणंग,सरपंच सौ वेदिका रावणंग,उपसरपंच विलास गावडे उपस्थित होते.
महिलांना मार्गदर्शन करताना श्री सामंत म्हणाले,” अंधश्रद्धामुळे महिलांनावर नेहमी अन्याय होत आहेत,महिलांनी एकोप्याने राहून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत शेजारी,मैत्रिणी यांच्याशी चर्चा केली पाहिजे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे लोक न्यायालय असून याठिकाणी अनेक वाद दोन्ही बाजूंशी चर्चा करून सामंजस्याने वाद सोडविले जातात.महिलांची कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर ती लोक न्यायालयात घेऊन या ” ते पुढे म्हणाले,”महिलांना संरक्षण देणारे अनेक कायदे आहेत.संपत्तीमध्ये समान वाटा देण्यात आला आहे.” यानंतर त्यांनी फोक्सो कायद्याची माहिती दिली.
श्रीमती सुखटणकर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली.महिलांना संरक्षित करणारे कायदेमध्ये कोणकोणत्या तरतुदी व कौटुंबिक अत्याचार कायद्याविषयी माहिती दिली.त्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या,” कायदे करून चालणार नाही तर समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे.स्त्री जन्मू नये अशी विकृत भावना फक्त पुरुषांच्यात नसते तर ती स्रियांमध्येपण असते ती बदलणे गरजेचे आहे.कायदा नैसर्गिक न्यायतत्व जाणतो.”
यानंतर महिलांच्या कायदेविषयक जागृती करणारी शॉर्टफिल्म दाखवण्यात आली.
पत्रकार श्रीम जान्हवी पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल यांचे विशेष आभार सौ साक्षी रावणंग यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रावणंग केले.या कार्यक्रमाला वाडीप्रमुख गोविंद गावडे,ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गावडे,सौ वर्षा रावणंग,सौ शुभांगी गावडे व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
www.konkantoday.com