
कोणत्याही परिस्थितीत नाणारचा रिफायनरी प्रकल्प होणार नाही– नामदार उदय सामंत
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परत एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसेना त्या भूमिकेवर कायम आहे असंही त्यांनी सांगितली. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखही आहेत. त्यांनी नाणारबाबत याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेना आजही त्या भूमिकेवर कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत नाणारचा प्रकल्प होणार नाही ही शिवसेनेची भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
www.konkantoday.com