
कळंबस्ते येथील शासनाच्या पोल्ट्रीतून अज्ञातांनी ४५० कोंबड्या लांबविल्या
कळंबस्ते येथील शासनाच्या पोल्ट्रीतून अज्ञातांनी ४५० कोंबड्या लांबविल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज पंचायत समितीमध्ये याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची पोल्ट्री अधिकार्यांनी बैठक बोलावली आहे. नुकतीच पंचायत समितीची ऑनलाईन मासिक सभा संपन्न झाली. यावेळी पं. स. सदस्य बाबू साळवी यांनी कळंबस्ते पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या विक्री संदर्भात विचारणा केली असता येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एम. टी. करावडे यांनी कळंबस्ते पोल्ट्रीमधून ४५० कोंबड्या चोरीस गेल्याची माहिती दिली. आता या कोंबड्या कोणी फस्त केल्या याचा शोध घेण्यात येत आहे
www.konkantoday.com