
कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज मध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरवात
रत्नागिरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (नाशिक) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास आजपासून सुरवात केली. येथील दि यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग अँड एमआरआय येथे बेसिक बीएस्सी नर्सिंग अंतिम वर्ष व पोस्ट बीएस्सी नर्सिंगच्या परीक्षा घेण्यात आल्या. सर्व वर्गखोल्या, आवारात सॅनिटायझेशन करण्यात आले आणि सर्व शासकीय नियम पाळून या परीक्षा झाल्या.
बेसिक बीएस्सीसाठी 43 विद्यार्थी व पोस्ट बीएस्सीसाठी 1 विद्यार्थ्याने परीक्षा दिली. पहिला पेपर अनुक्रमे प्रसूतीशास्त्र आणि सामाजिकशास्त्राचा झाला. ही परीक्षा 16 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून एकदिवसाआड पेपर होणार आहे.
परीक्षेसाठी दि यश फाउंडेशनचे नर्सिंग कॉलेज सज्ज झाले. लाद्या, भिंती, वर्गखोल्या, कार्यालय सर्व काही सॅनिटाईज करण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना फेसशिल्ड दिले. सर्व विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्हज दिले. विद्यार्थी कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांचे टेंपरेचर तपासले. सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.
दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास कोरोना महामारीच्या कालावधीत एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत सुरू होते.
सुरवातीला शासनाने परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. नंतर त्याविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा आवश्यक असल्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालानुसार व विद्यापीठाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजमध्ये आजपासून परीक्षा सुरळितपणे घेतल्या जात आहेत. याबाबत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
परीक्षेचे नियोजन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने, प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ आणि रजिस्ट्रार शलाका लाड यांनी केले. कॉलेजमध्ये या परीक्षेसाठी केंद्रनिरीक्षक म्हणून डॉ. सानिका कीर, केंद्रप्रमुख प्रा. रमेश बंडगर, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. चेतन अंबुपे, प्रा. कीर्ती करंबेळकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी मेहनत घेतली.
www.konkantoday.com