
रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने राजेंद्र कशेळकर जखमी
रत्नागिरी येथील आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता ओलांडणाऱ्या राजेंद्र मोरेश्वर कशेळकर यांना अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने ते जखमी झाले पोलीस अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत
यातील राजेंद्र कशेळकर हे चार तारखेला सकाळी सुरज मेडिकल ते आरडीसी बँक च्या दरम्यान आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता ओलांडत असताना कोणीतरी अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून येऊन धडक दिली आणि तो पळून गेला या अपघातात कशेळकर यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला व पायाच्या गुडघ्याच्या खाली फॅक्चर होऊन डोक्याला किरकोळ जखम झाली याबाबत कशेळकर यांनी अज्ञात दुचाकीस्वाराचा विरोधात शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com