
एसटीच्या एमआयडीसी येथील कार्यशाळेतून ८३ हजार रुपयाचे जुने स्पेअर पार्ट चोरीला
रत्नागिरी एसटीच्या विभागीय कार्यशाळा टीआरपी एमआयडीसी येथे एसटीचे बदललेले ८३ हजार रुपयाचे जुने स्पेअर पार्ट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे
एसटी बसच्या दुरुस्ती साठी लागणारे स्पेअर पार्ट हे भांडार शाखेकडून दिले जातात त्यानंतर बदललेले जुने स्पेअर पार्ट भांडार शाखेला परत दिले जातात अशा जुन्या स्पेअर पार्ट पैकी २८३ किलो पितळी किंग पिन बुश असे ८३ हजार ४८५ रुपये किमतीचे जुने स्पेअर पार्ट अज्ञात इसमाने चोरून नेले आहे ही बाब लक्षात आल्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे
,www.konkantoday.com