
बोगस ई पास प्रकरणी गुहागरातून मनसेच्या संपर्क सचिवाला अटक
राज्यात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यावर एका जिल्ह्यातून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने ई पास सुविधा सुरू केली. मात्र या ई पासमध्ये प्रचंड प्रमाणात बोगस पास मिळत असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातून मनसेचे तालुका संपर्क सचिव राकेश सुर्वे याला नाशिक पोलिसांनी अटक केल्याने गुहागर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com